हृता दुर्गुळे आणि टाईमपास 3: इंस्टाग्राम पोस्ट मधून दिसला हृताचा हटके अंदाज

0
391
Hruta Durgule and Timepass 3 Hrutta stubborn prediction seen from Instagram post

केतकी माटेगावकर, प्रिया बापट यानंतर आता टाईमपास 3 मध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळे दिसणार आहे. तिने इन्स्टा वर याबाबत एक टीझर शेअर केलय. टाईमपास मधील लोकप्रिय डायलॉग आई, बाबा आणि साईबाबा शप्पथ, नया है वह, असे डायलॉग फेमस आहेत. यापूर्वीच्या अभिनेत्रींनी यातील भूमिका चोख बजावल्या होत्या. आता टाईमपास 3 मध्ये हृता दुर्गुळे हिनेही जबरदस्त काम केल्याचे दिसून येत आहे. तिने सोशल मीडीयावर पोस्ट केली आहे. त्यामुळे आता टाईमपास 3 २९ जुलै ला येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ऋता दुगुळे पोस्ट

दरम्यान ऋता दुगुळेने यापूर्वी इंस्टाग्रामवर पल्लवी अशी कॅप्शन देत आणि बोटांनी 3 दाखवत एक खास फोटो शेअर केला होता. यामध्ये तिने हॅशटॅगद्वारा नवी भूमिका, लवकरच नवी घोषणा असं म्हटलं होते.त्यावरून नव्याने येणाऱ्या टाईमपास 3 मध्ये ती प्रमुख भूमिकेत असणार याचे अंदाज बांधण्यात येत होते. ऋता दुगुळे मराठी मालिकांमधून घराघरात पोहचली आहे. काही महिन्यांपूर्वी तिने ‘सिंगिंग स्टार’ या रिएलिटी शो चं सूत्रसंचलन देखील केले होते. लवकरच ‘अनन्या’ या चित्रपटातून ती सिनेमांमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या ती ‘दादा एक गूड न्यूज आहे.’ या नाटकामध्ये उमेश जाधव बरोबर मुख्य भूमिकेत काम करत आहे. लॉकडाऊन नंतर सध्या हे नाटक पुन्हा रंगमंचावर सादर होण्यास सुरूवात झाली आहे. नुकतीच ती विवाहा बंधनातही अडकली आहे.

hruta

२९ जुलै रोजी होणार चित्रपट रिलीझ
ऋता दुगुळेने यावेळी इंस्टाग्रामवर टाईमपास 3 चा टिझर व्हीडीओ शेअर करत, “आई बाबा आणि साईबाबा शप्पथ…आणतोय तीच मजा, तोच टाईमपास एका वेगळ्या अंदाजात… पाहा दगडू आणि पालवीच्या गोष्टीची झलक, ‘टाईमपास ३’ लवकरच…. असे कॅप्शन दिले आहे. हा चित्रपट २९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply