सोनाली कुलकर्णीच्या ‘त्या’ पोस्टला किरण मानेंनी दिले सडेतोड उत्तर 

0
568
Kiran Mane gave an unequivocal answer to Sonali Kulkarni's 'that' post

मराठी सिनेमासुष्टीतील अभिनेता किरण माने  हे अलिकडील काळात प्रसारमाध्यमांतून चर्चेत असलेले प्रमुख नाव. आताही किरण माने हे आपल्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. मराठी भाषा गौरव दिनी  बऱ्याच मराठी कलाकारांनी  मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा सोशल मीडियावर दिलेल्या आहेत. तर मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीरा मराठी भाषा दिनानिमित्त शेअर केलेल्या पोस्टमुळे ट्रोल करण्यात आले.

kiranmane sonalee
किरण माने यांनी दोन वेगवेगळ्या पोस्ट लिहून सोनाली कुलकर्णीला सडेतोड भूमिका मांडली आहे. किरण माने यांना मुलगी झाली हो  मालिकेतून वगळण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील हटके अंदाजातून शुभेच्छा दिल्या त्यात तिने म्हटले की, न आणि ण.. श आणि ष.ळ आणि ड, चांदणीमधील च आणि चंद्रामधील च, जहाजमधील ज आणि जीवनामधील ज यांच्या उच्चारातील फरक कळणाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! बाकीच्यांना मराठी भाशा दिणाच्या मणापासून षुभेच्छा!!!.’

kiranmane

सोनालीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला. तर काहींनी तिच्या प्रमाण भाषेवर कौतुकाची स्तुती सुमनं उधळली आहेत तर काहींनी टीका करत तिला धारेवर धरलेलं पाहायला मिळाले. यातून किरण माने यांनी केलेली कमेंट मात्र बहुतेकांचे लक्ष्य वेधून घेणारी ठरली आहे.

माने यांनी म्हटले की, ”उच्चार चुकवणार यांनी ‘डॅन्स’ची एक लाखाची सुपारी दिली की पारावर आणि ट्रालिवरबी नाचायचं. आणि इकडं येऊन त्यांची टर उडवायची हे बरे न्हवं. अस्सल सातारीत बोलनार या कायमनला न म्हन्नार या आमच्या लाडक्या राज्यांच्या वाढदिवसाला परवा परवाच साताऱ्यात नाचून गेल्यात म्याडम.या नाट्यांना प्रमाणभाषेत बोलनारं कुत्रंबी ईचारत नाय. सगळं यश मिळवलंय ते ग्रामीन भूमिका करूनच. लिश्ट काढा हिट पिच्चरची”.

sonalee
हे पाहताच तातडीने सोनाली कुलकर्णी यांनी फेसबुकवरील मराठी भाषा दिनानिमित्त लिहिलेली पोस्ट लगेच हटवली. यामुळे पुन्हा एकदा मराठी चित्रपट सृष्टीत वादाचे वादळ पुन्हा येणार आहे. सोनालीची ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली. पण या पोस्टवर अभिनेता किरण माने यांनी कमेंट केल्यानंतर सोनाली सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली. एवढंच नाही तर तिनं नंतर ही पोस्ट सोशल मीडियावरून डिलिटही केली. मात्र तोपर्यंत सोनालीची पोस्ट आणि त्यावरील किरण माने यांची कमेंट याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Leave a Reply