देव तारी त्याला कोण मारी,  कार ऍक्सीडेन्ट मध्ये होरपळला – चेहरा आणि हाथ दोघे ही केले ट्रान्सप्लांट.  

0
812
lucky-man-on-earth-accident-surgery-face-car-accident-marathi-trends world

अंग प्रत्यारोपण आणि शस्त्रक्रिया याविषयी तुम्ही अनेक कथा ऐकल्या असतीलच, पण अमेरिकेत पहिल्यांदाच डॉक्टरांच्या पथकाने एक अनोखे प्रत्यारोपण केले आहे.

अमेरिकेची यूनाइटेड नेटवर्क फॉर ऑर्गन शेयरिंग (UNOS) ने दिलेल्या माहिती अनुसार आत्तापर्यंत, जगभरात कमीत कमी 18 चेहर्याचे प्रत्यारोपण आणि 35 हात प्रत्यारोपण केले गेले आहेत, परंतु चेहरा आणि दोन हात एकाच वेळी प्रत्यारोपित करणे अतिशय कठीण सर्जरी असते.

असा प्रयोग करण्याचे प्रयत्न काही वर्षांपूर्वी म्हणजे साल २००९ व २०११ मध्ये ही केला गेला होता पण दोघे ही वेळेस त्यांना निराशा आणि माघारच पत्करावी लागली. पण सरते शेवटी त्यांनी नुकताच हाथ व चेहरा एक साथ ट्रान्सप्लांट करण्यात यश मिळवले आहे , म्हणतात ना ‘कोशिश करणे वालो की हार नही होती’ हेच खरे.

तर झाले असे की, अमेरिकेतील न्यू जर्सी ह्या भागात राहणारे डिमियो ह्यांचा एक भयंकर रोड ऍक्सीडेन्ट झाला. डिमियो नाईट शिफ्ट करून आपल्या घरी परतत असतांना त्यांना डुलकी लागली व अचानक त्यांची गाडी भरधाव वेगाने पोलवर जाऊन आदळली व पलटी झाली.

त्यानंतर डिमियो ह्यांना काही समजायच्या आतच त्यांच्या गाडीने अचानक पेट घेतला व गाडी धु धु करत पेटून उठली. तिथे जमलेल्या काही लोकांनी मदतीचा हाथ पुढे केला व डिमियो ह्यांना पेटत्या गाडीतून कसे बसे खेचून बाहेर काढले.

नशीब बलवत्तर म्हणून डिमियो ह्या ऍक्सीडेन्ट मधून वाचले तर खरे पण पेटलेल्या गाडीतून त्यांना बाहेर काढे पर्यंत ते त्या आगीत बरेच होरपळून गेले होते. त्या नंतर ते बरेच महीने कोमा मध्ये होते. शुद्धीत आल्या नंतर त्यांच्या वर तब्ब्ल २० शस्त्रक्रिया व बऱ्याच स्किन ट्रीटमेंट करण्यात आल्या. तरीही ते काहीही बघण्यास व हातांचा वापर करण्यास असमर्थ होते.

शेवटी २०१९ मध्ये डॉक्टरांनी डेमियो ह्यांच्यावर पुन्हा सर्जरी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. लगेचच डॉक्टरांनी डेमियो ह्यांच्या साठो डोनर शोधण्यास सुरुवात केली. पण हे ही इतके सोपे नव्हते कारण डोनर असा हवा होता ज्याचा स्किन टोन व हाथ डेमियो ह्याच्या टोन व हाथाशी मेळ घेऊ शकेल. प्रत्यक्षात स्किन टोन व हाथ ह्यांचा मेळ होऊ शकेल ह्याची वैज्ञानिक शक्यता फक्त ६ टक्के इतकीच असते. पण ह्या शोध कार्यास सुरवात होताच त्याला कोरोना चे विघ्न आडवे आले व शोध कार्याचा वेग अचानक मंदावला गेला.

शेवटी ऑगस्ट महिन्यात एक योग्य डोनर सापडला. डॉक्टरांनी ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत कोविड वार्डातच सर्जरी वार्ड उभा केला व तिथे ट्रान्सप्लांट साठी लागणाऱ्या अत्यावश्यक सेवा उभ्या करण्यात आल्या. अति किचकट अश्या शस्त्रक्रियेत त्यांनी दोघी हातांना व त्यांच्या बारीक नसांना आपापसात जोडण्यात यश मिळवले व सोबत त्यांच्या चेहऱ्याची ही ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यात आली.

डिमियो ची सर्जरी करणाऱ्या मेडिकल टीम चे डॉक्टर एडुआर्डो रोड्रिग्ज ने मीडिया शी बोलतांना सांगितले के अश्या सर्जऱ्यांचे मागील ट्रैक रेकॉर्ड पहाता त्यांना यशाची खूप कमी हमी आणि आशा होती तरीही त्यांनी एक शेवटचा प्रयत्न करून पहिला ज्यात त्यांना यश आले.

नोव्हेंबर मध्ये डेमियो ह्यांना हॉस्पिटल मधून डिसचार्ज देऊन त्यांना एका री हॅबिलेशन सेंटर मध्ये ठेवण्यात आले. तिथे रोज त्यांच्या विविध फिजिओ थेरेपी व एक्सरसाइज चालतात. त्यात प्रामुख्याने अंगठे , बोटांच्या हालचाली , हाताची हालचाल व व्यायाम तसेच चेहऱ्याचे विविध व्यायाम जसे भुवया हलवणे , तोंडात हवा भरणे , शिट्टी वाजवणे , डोळ्यांची उघडझाप सारखे व्यायाम त्यांच्या कडून करवून घेतले जातात.

डेमियो आता आपल्या पालकांसोबत असून ते आता आयष्याकडे खूप सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन बघतात. ते म्हणतात की खरं तर ही एक नुकतीच सुरुवात आहे पण मिळालेले दुसरे आयुष्य अतिशय अनमोल आहे, आणि आता इथून परत फिरणे किंवा ह्या पायरीवर येऊन हार मानणे आता संभव नाही. 

डेमियो ह्यांना झाललेला अपघात व त्यांनी खूप धैर्याने केलेला त्याचा सामना सर्वासाठी खूप प्रेरणा दायक आहे.

Leave a Reply