‘कोण होणार करोडपती’ नव पर्व लवकरच, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वाचा..

0
403
The new episode of 'Who will be a millionaire' is coming to you soon

भरघोस ज्ञान आणि मनोरंजन यांचा संगम घडवून आणणाऱ्या ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं नवं मराठी पर्व सोनी मराठी वाहिनीवर येण्यास सज्ज झालेलं आहे.

Kon_Honar_Marathi_Crorepati

सोनी मराठीच्या छोट्या पडद्यावरील ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सर्व घराघरांत पोहचला आहे. तुमचं ज्ञान ही तुमच्या यशाची गुरूकल्ली आहे, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळतं.’ कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार असून, त्यांच्या सूत्रसंचालनाची स्टाईल सर्व प्रेक्षकांनी अगदी भावली आहे. सचिन खेडेकर मराठी घराघरांत सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. आपला अभिनय आणि आपला आवाज यांमुळे सचिन खेडेकर प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत.

प्रत्येक खेळात कोणी जिंकतं किंवा कोणी हरतं, पण या खेळात फक्त एकच स्पर्धक जिंकतो, असं सांगणारा कार्यक्रमाचा प्रोमो देखील प्रदर्शित झाला आहे. २३ फेब्रुवारी ते ८ मार्च यादरम्यान ‘कोण होणार करोडपती’ या खेळात सहभागी होण्यासाठीचे प्रश्न सुरू होतील. १४ दिवस आणि १४ प्रश्न असं याचं स्वरूप आहे. 7039077772 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंवा सोनी लिव्हवर नावनोंदणी करून या खेळात सहभागी होऊ शकता.

Call Logos

करोडपती बनण्याचं स्वप्न सगळेच पाहतात, पण प्रत्येकाला ती संधी मिळत नाही. आणि अशी संधी ज्याला मिळाली त्याचं नशीबच. पण आपल्याला असलेल्या ज्ञानाच्या आधारे ते स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सामान्य प्रेक्षकांना उपलब्ध देतं.

आता ज्ञानाच्या जोरावर यशाची शिखरं गाठायला तयार राहा, कारण सोनी मराठी वाहिनी लवकरच घेऊन येते आहे, ‘कोण होणार करोडपती’. या कार्यक्रमाची चाहूल लागताच आता सर्व प्रेक्षकांना या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता लागली आहे.

Leave a Reply