मराठी सिनेसृष्टीची चंद्रमुखी आली! नुसत्या टीझरमधून चंद्रमुखीनं लावलं वेड…

0
379

आजकाल मराठी सिनेसृष्टी बघायला गेलं तर नुसते एकामागोमाग दमदार आणि ब्लॉकबास्टर चित्रपट आणत आहे. मराठी सिनेमातील ‘कच्चा लिंबू’ आणि ‘हिरकणी’ सारखे लोकप्रिय चित्रपट देणारा अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘चंद्रमुखी’च्या तयारीत मग्न आहे. नुकताच त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून या सिनेमाचा दुसरा टीजर प्रदर्शित केला. गेल्या वर्षी ‘चंद्रमुखी’च्या पाहिल्या टीझरने इंडस्ट्रीत चांगलीच खळबळ उडवून दिली होती. आता निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाचा नवीन टीझर रिलीज केला आहे.

oak prasad

नुसत्या सेकंदाच्या या टीजरनं सर्व प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. हि सहा सेकंदाची क्लिप सुंदरपणे सजवलेल्या स्टेजवर ढोलच्या एका चित्तवेधक तालाने सुरू होते. ही एक महत्त्वाकांक्षी चतुर राजकारणी आणि तमाशातील एका मोहक सुंदर मुलीची प्रेमकथा आहे. ‘चंद्रमुखी’ हा विश्वासपाटील लिखित याच नावाच्या प्रसिद्ध पुस्तकाचे रूपांतर आहे, जो यावर्षी सिनेसृष्टीत रिलीज होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष यावर लागले आहे.

𝗰𝗵𝗮𝗻𝗱𝗿𝗮𝗺𝘂𝗸𝗵𝗶

या चित्रपटाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे असून अजय–अतुल या दमदार जोडीने ‘चंद्रमुखी’ला संगीत दिले आहे. या चित्रपटातील ‘चंद्रमुखी’ आणि इतर कलाकारांची नावे मात्र अद्यापही गुपित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. हा चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Leave a Reply