जेव्हा श्रीदेवीला भेटण्यासाठी संजूबाबा पोहोचला होता थेट चित्रपटाच्या सेटवर?

0
142
shreedevi-sanjaydutt-story-bollywood-news-latest
shreedevi-sanjaydutt-story-bollywood-news-latest

जेव्हा श्रीदेवीला भेटण्यासाठी संजूबाबा पोहोचला होता थेट चित्रपटाच्या सेटवर…! चक्रावून गेली होती श्रीदेवी…!

 

संजूबाबा आपल्या बिनदास्त हरकतीमुळे कायम बॉलिवुडमध्ये चर्चेचा विषय असतो. घरच्या श्रीमंती मुळे संजय दत्त तरुण वयामध्ये अक्षरश: नशेच्या आहारी गेला होता. संजय दत्तने 100 पेक्षा जास्त अफेअर्स केले आहेत, असे तो स्वतःच सांगतो.

दिवंगत बॉलिवूड सुपरस्टार ‘सुनील दत्त’ व ‘नर्गिस’ यांचा मुलगा संजय दत्त हा आई नर्गिस व आपल्या वडिलांच्या अतिलाडामुळे व श्रीमंती मुळे एकेकाळी ड्रग्सच्या आहारी गेला होता. मात्र संजूबाबा आता प्रेक्षकांना आपल्या गत जीवनाबद्दल अगदी मोकळेपणे सांगून, तुम्ही ह्या चुका करू नका असेही सांगताना दिसतो. संजय दत्त याने आपल्या तारुण्यामध्ये अनेक आशा घटना व किस्से करून ठेवले आहेत की ज्यामुळे तो कायमच बॉलिवुडमध्ये चर्चेचा विषय राहिली आहे.

संजूबाबाच्या बिनधास्त वागणुकीमुळे त्यांच्या वडिलांना देखील अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. आयुष्यात अनेक चढउतारांचा व संकटांचा सामना करून संजय दत्त आता आपल्या आयुष्यामध्ये स्थिर झाला आहे. नुकताच संजूबाबा कॅन्सरवर यशस्वीरित्या उपचार करून भारतामध्ये परतला आहे. आपल्या तरुणपणी संजूबाबा अक्षरश: मनात येईल तसा वागत असे.

आज आम्ही आपल्याला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत जी आज पर्यंत मीडियासमोर आली नाही. संजय दत्त हा ‘श्रीदेवी’ चा खूप मोठा फॅन होता. ऐंशीच्या दशकामध्ये श्रीदेवी तिच्या करिअरच्या उच्च शिखरावर पोहोचली होती. प्रत्येक तरुण मुलाच्या दिलाची धडकन असलेली श्रीदेवी तिच्या अलौकिक सौंदर्यामुळे त्याकाळी प्रत्येक तरुणाच्या मनात राज्य करत होती. संजय दत्तला श्रीदेवी सोबत भेटण्याची मनापासून इच्छा होती, पण बरेचदा त्याला ते शक्य होत नव्हते.

एक दिवस संजय दत्त मुंबईत असताना त्यांना त्यांच्या मित्राने ‘हिम्मतवाला’ ची शूटिंग चालू असून ‘श्रीदेवी’ या फिल्ममध्ये एक्ट्रेस आहे असे समजले. मग काय संजूबाबाच्या आनंदाला आणि उत्साहाला जणू उधाणच आले! दारूचे नशेमध्ये धूत असलेला संजूबाबा श्रीदेवीला भेटण्यासाठी थेट सेटवर जाऊन पोहोचला!

सेटवरील कर्मचाऱ्यांना त्याने श्रीदेवी यांना भेटण्याबद्दल विचारणा केली, मात्र संजूबाबाची अवस्था पाहून त्याला सेटवरील कर्मचाऱ्यांनी श्रीदेवी पर्यंत जाऊ नये म्हणून अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र संजूबाबा हट्टालाच पेटला  व कोणालाही न जुमानता थेट श्रीदेवी ज्या रूममध्ये होती त्या रूममध्ये जाऊन पोहचला! संजूबाबाची नशेमध्‍ये धूत अवस्था पाहून श्रीदेवी अतिशय घाबरली.

त्यानंतर संजूबाबा आणि श्रीदेवी यांच्यामध्ये कधीही बोलणे झाले नाही व श्रीदेवी देखील संजूबाबा सोबत कोणताही पिक्चर करण्यास नकार देत असे. काही वर्षांनंतर ‘जमिन’ या चित्रपटांमध्ये श्रीदेवी आणि संजूबाबा यांनी एकत्र काम केले. मात्र काही कारणास्तव हा चित्रपट रिलीज झाला नाही. त्यानंतर ‘गुमराह’ या चित्रपटात श्रीदेवी आणि संजूबाबा यांनी एकमेकांसोबत काम केले, मात्र असे म्हटले जाते की सेटवर हे दोघे एकमेकांशी बोलत देखील नव्हते.

आपल्या बिनदास्त, डॅशिंग वर्तनाने व व्यवहाराने संजय दत्त नेहमीच चर्चेत राहिले आहेत. संजूबाबाच्या वागणुकीमुळे त्याचा दरारा कायम फिल्म इंडस्ट्रीमध्ये असतो व मोठे मोठे बॉलिवूड सेलिब्रिटीज देखील संजूबाबाला वचकून असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here