आपल्या कन्येचे भविष्य करा सुरक्षित; या पाच योजनांमध्ये करा गुंतवणूक

0
389
Secure your daughter's future; Invest in these five schemes

समाजातील लिंग-आधारित भेदभाव दूर करण्यासाठी आणि पुरुष-प्राधान्य असलेल्या या जगात मुलींच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी, मुलींच्या विकासासाठी सरकारने मुली वाचवा, बेटी बचाओ बेटी पढाओ आणि अशा अनेक योजना केल्या आहेत.सध्या सुकन्या समृद्धी योजना, आवर्ती मुदत ठेव योजना व मुदत ठेव, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पब्लिक प्रोव्हिडंट फंड, एसआयपी द्वारे म्युचअल फंडात (Mutual Fund) केलेली गुंतवणूक, हे पालकांसमोरील गुंतवणुकीचे काही चांगले पर्याय आहेत. यातील कोणत्याही पर्यायात केलेली गुंतवणूक भविष्यात तुमच्या राजकन्येला नक्कीच उपयोगी पडेल.Sukanya Samriddhi Yojana

सुकन्या समृद्धी योजना
मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे यासाठी सरकारने २०१५ मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत 10 वर्षांखालील मुलींसाठी टपाल खाते अथवा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत या योजनेचे खाते उघडता येईल. या योजनेत दोन मुलींच्या नावे एकाच बँकेत अथवा टपाल खात्यात या योजनेतंर्गत गुंतवणूक करता येईल आई-वडिल अथवा कायदेशीर पालकाला मुलीच्या नावे खाते उघडता येईल. खाते उघडल्यापासून जास्तीत जास्त 14 वर्षांपर्यंत किंवा मूल 21 वर्षांचे होईपर्यंत समृद्धी खात्यात पैसे जमा करता येतात. मुलीची 21 वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा लग्न झाल्यावर ही योजना परिपक्व होते. योजनेत 14 वर्षांत सरकारने जाहीर केलेल्या व्याजदरानुसार रक्कम जमा होते.

मुदत ठेव
आपण आपल्या मुलीसाठी मुदत ठेव (FD) सुरू करू शकता. बचत खात्यापेक्षा त्याला जास्त व्याज आहे. जर तुम्ही एकरकमी रक्कम जमा करून बचत करू शकत नसाल, तर तुम्ही आवर्ती ठेव (RD) बनवू शकता. आपण वेगवेगळ्या बँकांच्या एफडी आणि आरडी दरांची तुलना करून आपल्या सोयीनुसार बँका आणि खाती निवडू शकता.अनेक वर्षे केलेली अर्थसाधना तुमच्या मुलीला योग्य वेळी आर्थिक पाठबळ देऊ शकते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
ठराविक मुदतीसाठी या योजनेत तुम्हाला गुंतवणूक करता येते. टपाल खात्यात या योजनेची संपूर्ण माहिती मिळते. या योजनेत सध्या 5 वर्षांच्या गुंतवणुकीसाठी 6.8 टक्के वार्षिक व्याजाने परतावा मिळतो. या योजनेत कमीत कमी 1000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा आखून देण्यात आली नाही. 10 वर्षाच्या मुलीसाठी तिचे आई-वडील, कायदेशीर पालक यांना खाते उघडता येते. विशेष म्हणजे या योजनेत केलेली गुंतवणूक ही आयकर खात्याच्या 80 सी नियमानुसार, कर सवलतीस पात्र असते.

पब्लिक प्रोव्हिडंट फंड
पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजनेतील गुंतवणूक ही कर सवलतीस पात्र आहे. या योजनेत 7.1 टक्के वार्षिक व्याजदराने परतावा मिळतो. एका आर्थिक वर्षात या योजनेत कमीत कमी 500 ते कमाल 1.5 लाख रुपये गुंतवणूक करता येते. पीपीएफ खाते टपाल कार्यालय अथवा बँकेत उघडता येते. पीपीएफ खात्यात 15 वर्षांच्या कालावधीची मर्यादा आहे. काही आवश्यक परिस्थितीत कालावधी पूर्ण होण्याअधीच खाते बंद करता येते. तसेच त्याची मुदत पुढे पाच वर्षे वाढविता येते.

म्युच्युअल फंड
सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे केलेल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने अनेकांना मालामाल केलेले आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी अर्थसल्लागार आणि तुमचा अभ्यास महत्वाचा आहे. म्युच्युअल फंड नेमका कोणत्या उद्देशाने तुम्ही घेत आहात, याचा निर्णय झाला तर लक्ष साध्य करण्यासाठी कितीचा एसआयपी निश्चित करावा हे समोर येते. या योजनेत जोखीम असल्याने अभ्यास करुनच गुंतवणूक करावी . फंडाचे अनेक प्रकार असतात आणि त्यातील धोकेही तसे असतात. त्यामुळे गुंतवणूक करताना तुम्ही अलर्ट असणे गरजचे असते.

Leave a Reply