श्रीकृष्णा ने पांडवांना सांगितले होते कलयुगातले हे पाच सत्य, एकूण तुम्हालापण लाज वाटेल…!

0
742
shree-krishna-pach-pandav-5-story-question-kalyuga-arjun-bhim-answer
कलियुगातील कटू सत्य आणि त्या विषयी माहिती, भगवान श्री कृष्णाने महाभारत काळातच देऊन ठेवली आहे. लोकं कलियुगात एकमेकांशी कसे वागतील, आयुष्य कश्या प्रकारे व्यतीत करतील, ह्या विषयी चे भाकीत त्यांनी खूप आधीच करून ठेवले आहे. प्रस्तुत लेखात आपण भगवान श्री कृष्ण ह्यांनी कलियुगासंबंधी सांगितलेले पाच कटू सत्य जाणून घेणार आहोत. ज्याचे अक्षरशः प्रमाण तुम्हाला आजच्या काळात दिसून येईल.

कलियुगातील कटू सत्य:
महाभारत काळात, पांडवांना कलियुगाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यांनी एकदा श्रीकृष्णाला विचारले की कलियुगात माणूस कसा असेल? लोकांचे विचार आणि आचरण कसे असेल होईल ह्या विषयी प्रश्न विचारले. हे प्रश्न ऐकून श्री कृष्णाने पांडवांना जंगलात जाण्यास सांगितले.

त्यांनी सोबत हे हि सांगितले कि तुम्हाला जंगलात जे जे दिसेल त्याचा वृत्तांत परत आल्या वर मला सविस्तरपणे सांगा. श्री कृष्णाची आज्ञा घेऊन हे पाच भाऊ जंगलात गेले आणि काही वेळाने परत आले. त्या नंतर पाचही भावांनी जंगलात जे जे पाहिले ते एक एक करून श्री कृष्णाला सांगितले.

युधिष्ठिरांचे प्रश्न:
सर्व प्रथम, युधिष्ठिराने श्री कृष्णाला सांगितले की त्याला जंगलात दोन सोंडेचा हत्ती दिसला. हे ऐकून कृष्ण म्हणाले की, कलयुगात असे लोकं राज्य करतील जे बोलतील काही आणि वेगळं काही तरी सांगत जातील. हे लोकांचे दोन्ही बाजूंनी शोषण करतील.

भीम प्रश्न:
त्यानंतर भीमाने सांगितले की त्याने जंगलात पाहिले की, एक गाय तिच्या वासराला इतकी चाटत होती की त्या वासराचे रक्त बाहेर येऊ लागले. श्री कृष्णाने त्याचा अर्थ सांगितला. श्री कृष्णाने सांगितले कलयुगचा माणूस आपल्या आपत्याशी इतका लळा लावतील, त्याच्याशी इतके प्रेम करतील कि अशा प्रेमामुळे मुलांचा विकास थांबेल.

जर दुसऱ्याच्या घरात एखादा मुलगा साधू झाला तर सर्व जण त्याला भेटायला जातात , त्याचा आदर सत्कार करतात पण जर स्वतःचाच मुलगा भिक्षु झाला तर मग पालक मात्र दुखी होतात. कलियुगात पालक आपल्या मुलांना मोहपाशात अडकवून ठेवतील व त्यांचा विनाश करतील.

श्री कृष्णाने पुढे अजून नमूद केले कि मुलावर पित्याचा नव्हे तर आईचा अधिकार असतो , तसेच मुलीवर आईचा नव्हे तर वडिलांचा अधिकार असतो , त्याच प्रमाणे शरीरावर मृत्यूचा व आत्म्या वर परमात्म्याचा अधिकार असतो.

अर्जुनाचा प्रश्न :
भीमसेन नंतर अर्जुनाने सांगितले की त्याने पंखांवर वेद लिहिलेला एक पक्षी पाहिला. पण तो पक्षी मृत मनुष्याचे मांस खात होता. हे पाहून मला आश्चर्य वाटले. ह्या वर श्रीकृष्णाने सांगितले की कलियुगात असे लोक असतील ज्यांना विद्वान तर म्हटले जाईल, परंतु त्यांच्या मनात दुसऱ्याविषयी अतिशय वाईट विचार असतील. त्यांच्या मनात समोरचा केव्हा मरतो व त्याची संपत्ती मला केव्हा मिळवता येईल असा त्यांचा हेतू असेल. एखाद्या व्यक्तीची स्थिती कितीही मोठी असो, परंतु त्याची दृष्टी इतरांच्या संपत्तीवर राहील. कलियुगात संत कमी व दुसऱ्याची इस्टेटवर डोळा ठेऊन बसलेले गिधाडंच जास्त असतील.

नकुलाचे प्रश्न:
अर्जुनानंतर नकुलने श्रीकृष्णाला जंगलात काय पहिले हे सांगितले. नकुल म्हणाला की, मी पाहिले की डोंगरावरून एक मोठा दगड खाली पडला. डोंगरावरून कोसळत येणाऱ्या त्या खडकाला मोठे मोठे झाडं देखील थांबवू शकले नाहीत. पण त्याच दगडाला एका छोट्याशा रोपट्याने थोपवून ठेवले, आणि तो खडक तिथेच थांबला.

ह्या दृश्याचा अर्थ सांगताना श्री कृष्ण म्हणाले की कलयुगात माणसाची बुद्धी कमकुवत होईल. त्या मुळे त्याचे अध:पतन होईल व ह्या अध:पतनास रोखण्यासाठी धन अथवा सत्ता रुपी मोठाले वृक्ष असमर्थ असतील तर हरिनाम रुपी छोटेसे रोपटे मनुष्याचे अध:पतन रोखण्यास मदत करतील. हरी कीर्तनाने मानवाच्या आयुष्याचा मार्ग प्रशस्त होत जाईल.

सहदेव यांचे प्रश्न:
आपल्या चार भावांप्रमाणेच सहदेवनेही श्रीकृष्णाला जंगलात जे घडले , जे बघितले त्या बद्दल सांगितले. सहदेवने सांगितले कि त्याने जंगलात अनेक विहिरी पाहिल्या. पण त्यापैकी सगळ्यात मध्यभागी व सर्वात खोल व मोठी असलेलीच विहीर रिकामी होती व इतर सर्व विहिरी पाण्याने भरलेल्या होत्या.

कृष्णाने सहदेवला त्याचा अर्थ सांगितला आणि सांगितले की कलियुगातील श्रीमंत व्यक्ती त्यांच्या छंदांसाठी, मुली विवाहासाठी, भरपूर उत्सव साजरा करण्यासाठी पैसे खर्च करतील.

परंतु ते भुकेल्या दिन दुबळ्या माणसाची मदत करण्यात रस घेणार नाही. इंद्रियांच्या समाधानासाठी, मद्यपान, मांस खाणे आणि व्यसन व्यतीत करण्यासाठी पैसा खर्च होईल. पण जे लोकं अशा सवयींपासून दूर राहातील त्यांच्या वर कलयुगचा प्रभाव होणार नाही व त्या वर ईश्वर कृपा कायम असेल. तर मित्रांनो, कलयुगातील हे पाच कटू सत्य आहेत. जे श्री कृष्णाने महाभारत काळातच सांगून ठेवले आहेत .

Leave a Reply