तारक मेहता फेम बबिता अडचणीत, चार तास केली कसून चौकशी!

0
362
Tarak Mehta fame Babita in trouble, four hours thorough investigation

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकेत बबिता जिने साकारली आहे ती सध्या काही अडचणींचा शिकार होत आहे. बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता हिला पोलिसांनी अटक केली होती. मात्र, ४ तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी आता मुनमुन दत्ताची जामिनावर सुटका केली आहे.

Munmun Dutta

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुनमुन दत्ता हरियाणातील हांसी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि डीएसपी विनोद शंकर यांच्यासमोर हजर झाली होती. मुन्मुणी दत्तावर दलित समाजावर भाष्य केल्याप्रकरणी एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं होता. या सर्व प्रकरणी पोलिसांनी मुनमुन दत्ताला अटक करून 4 तास चौकशी केली आणि नंतर जामिनावर सुटका केली.

mmoonstar

मुनमुन दत्ता विरुद्ध 13 मे 2021 रोजी एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर मुनमुनने या प्रकरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने 22 सप्टेंबर 2021 रोजी ही याचिका फेटाळली होती. यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर करताना मुनमुन दत्ताने अनुसूचित जातीबद्दल अपमानास्पद कमेंट केली होती. या वादामुळे मुनमुन दत्ता विरुद्ध हांसीमध्ये बराच काळ खटला सुरू आहे. आता मात्र तिला जमीन मिळाली आहे.

Munmun Dutta tarak mehata

Leave a Reply