हेमांगी कवीची ती पोस्ट चर्चते….

0
337
that-post-of-hemangi-kavi-is-discussed

मराठी अभिनेत्री हेमांगी कवी सातत्याने काही ना काही पोस्टमुळे सदैव चर्चेत असते आणि त्यामुळे ती बऱ्याच प्रमाणात ट्रोल होताना आपण सगळेच पाहत असतो.आता सध्या ती चालू असलेल्या राजकीय घडामोडीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून राजकीय वातावरणात एक प्रकारची तेढ निर्माण झाली आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राजकीय स्थिती खालावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह कोंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून महविकासआघाडी सरकार टिकवण्यासाठी जोरदार प्रयन्त केले जात आहे.पण तरी देखील त्यात त्यांना यश आल्याचे दिसून येत नाही आहे.

शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांनी गुवाहाटी येथे एकमुखाने आपल्याबाबत निर्णय घेण्याचे ठरवले आहे. तसेच सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. यामुळे राज्यातील राजकारणात गोंधळ निर्माण झाल्याचा दिसत आहे. यावर भिन्न प्रक्रिया समोर आल्या आहेत.अभिनेत्री हेमांगी कवी हीने एक पोस्ट शेअर केली आहे.

हेमांगी कवी खासकरून राजकीय घडामोडींवर पोस्ट शेअर करत असतेच. नुकतंच तीने राज्यात चालू असलेल्या राजकीय विषयात हात घालत तिने तिच्या इन्स्टाग्राम सोशल साईड वर म्हंटले आहे की,’आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?’ असे भाष्य करत ही पोस्ट शेअर केली आहे.

तिच्या ह्या क्लिष्ट अशा पोस्टमुळे तिला अनेकांनी ट्रोल केले आहे.
“माणसाला जनावर म्हणलं तर राग येतो आणि वाघ म्हणलं की भारी वाटतं. पण त्यांना हे कोण सांगणार की वाघ सुद्धा जनावरच आहे.” तसचे अजून एका नेटकाऱ्यांने कंमेंट केली आहे. ती अशी की, महाराष्ट्रात वाघ फक्त दोनच होऊन गेले, सर्वश्रेष्ठ छत्रपती शिवराय आणि दुसरे म्हणजे संभाजी महाराज, असे म्हंटल आहे. तर एकाने असे म्हंटले आहे राजकारणात फक्त दोन वाघ होऊन गेले ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे म्हणजे आनंद दिघे साहेब हेच आहेत.

Leave a Reply