“या” मराठी मालिकेचा होणार चक्क ‘कन्नड’ भाषेत रिमेक!

0
333
There will be a remake of Aggabai Sasubai Marathi series in Kannada language

छोट्या पडद्यावरील झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेचा लवकरच कन्नड भाषेत रिमेक होणार आहे.

छोट्या पडद्यावरील ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका सर्व घराघरात असलेली लोकप्रिय मालिका आहे. निवेदिता सराफ, डॉ. गिरिश ओक आणि तेजश्री प्रधान ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत मुख्य भूमिकेत होते. आणि लवकरच या मालिकेचे चक्क ‘कन्नड’ भाषेत रिमेक होणार असल्याच समजत आहे. याआधी या मालिकेचे तामिळ आणि मल्याळम भाषेतदेखील रिमेक झाले होते.

 

Aggabai Sasubai

‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर ‘अग्गंबाई सूनबाई’ नावाची मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘अग्गंबाई सूनबाई’ ही मालिका ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेचा दुसरा भाग होती. या मालिकेत नात्यांमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर भाष्य करण्यात आले होते.

Aggabai Sasubai in kannad

 

‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेप्रमाणेच ‘देवमाणूस’ मालिकेच्या पहिल्या भागाचादेखील लवकरच कन्नड भाषेत रिमेक होणार आहे. ‘देवमाणूस’ ही मालिका सर्व प्रेक्षकांना आवडली म्हणून आता त्यांच्या चाहत्यांनी ‘देवमाणूस’ मालिकेचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे.

आता ही नवल आणि उत्सुकतेची बाब असेल की आता ही मराठी मालिका पुन्हा एकदा भारतीय स्तरावर मोठी कामगिरी बजावणार आहे.

Leave a Reply