घटस्फोटानंतर हृतिक रोशन पुन्हा लग्न करणार का?

0
444
Will Hrithik Roshan remarry after divorce

नुकतेच हृतिक रोशनला दोनदा डिनर डेट साठी एका मुलीसोबत स्पाॅट करण्यात आलं. मात्र सुझान खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन अभिनेत्री सबा आजादला डेट करत असल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती. काहीदिवसांपूर्वी दोघांना एका हॉटेलमध्ये डेट करताना स्पॉट करण्यात आलं. असून दोघे एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना दिसले. पण आता मात्र हृतिक आणि सबामध्ये एका तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. या व्यक्तीने तर हृतिकसोबत लग्न करण्याची इच्छाच व्यक्त केली आहे

hrithik roshan datiing girl

एका मुलाखती दरम्यान सबा आणि हृतिकमध्ये आलेल्या तिसऱ्या व्यक्तीचं नाव अभिनेत्री गायत्री भारद्वाज आहे असे समजले. एका मुलाखती दरम्यान गायत्रीला कोणाला डेट करायला आवडेल आणि कोणासोबत लग्न करायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला.

या प्रश्नाचं उत्तर देताना गायत्री म्हणाली, ‘मला अभिनेत्री सिद्धांत चतुर्वेदीला डेट करायला आवडेल. पण माहिती नाही की, तो सिंगल आहे की नाही. पण मी त्याची खूप मोठी फॅन आहे….’
पण लग्न कोणासोबत करायला आवडेल तर त्यावर तिनं लग्न करण्यासाठी गायत्रीने अभिनेता हृतिक रोशनचं नाव घेतलं. ती म्हणाली, ‘मला असं वाटतं तर नाही की हृतिक पुन्हा एकदा लग्न करण्यासाठी तयार असेल. लहानपणापासून हृतिक माझा क्रश आहे. त्यामुळे मला हृतिकसोबत लग्न करायला आवडेल.’

Leave a Reply