‘पापा की परी’ म्हणणाऱ्या कंगनाला आलिया भट्टचे भन्नाट उत्तर…

0
397
Alia Bhatt's abandoned answer to Kangana who says Papa Ki Pari ...

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आलियाचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिची कारकिर्द बरीच वादग्रस्त आहे. अनेकदा ती चर्चेत असते अशातच तिने गंगुबाई चित्रपटात विरूद्ध एक पोस्ट केली होती या पोस्टला आलिया भट्ट ने शांत मार्गाने प्रतिउत्तर दिले आहे.

aliaa bhatt gangubai

कंगनाने तिच्या एका पोस्टमध्ये ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट धुळीला मिळणार असल्याचे म्हटले होते. तर शुक्रवारी २०० कोटी रुपये जाळणार असल्याचेही कंगनाने सांगितले होते. त्याचवेळी आलियाने आता कंगनाच्या या गोष्टींवर प्रतिक्रिया दिली आहे. नुकतेच ‘गंगुबाई काठियावाडी’मधील ‘मेरी जान’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याच्या लाँचिंगवेळी आलिया कोलकात्यात गेली होती. यातच कंगनाच्या बोलण्याला आलियाने सडेतोड उत्तर दिले आहे.

Kangana Ranaut

कंगनाला आलियाने भगवद्गीतेतील एक श्लोक उच्चारला आहे. ती म्हणाली की, “भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की, काहीही नाही केले तरी अनेकवेळा करणे असते. मला एवढेच म्हणायचे आहे.” या चर्चेत आलियाने कंगना रणौतचे नाव घेतले नाही. मात्र आता आलिया कंगनाला तिच्या कामातून उत्तर देण्याची तयारी करत असल्याचे मानले जात आहे. या चित्रपटाद्वारे आलिया पहिल्यांदाच पडद्यावर डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळेच चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

aliaa bhatt gangubai film photos

कंगनाने तिच्या दुसऱ्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये, कंगना रणौतने करण जोहरला ‘बॉलिवूड माफिया डॅडी पापा’ म्हणत त्याची खिल्ली उडवली. कंगनाने लिहिले की, “बॉलिवूडचे माफिया डॅडी पापा ज्यांनी एकट्याने फिल्म इंडस्ट्रीतील वर्क कल्चर नष्ट केले आहे.”आता हॉलिवूड आणि दक्षिणेकडे पडदे सरकले आहेत यात आश्चर्य नाही.”

Alia Bhatt

Leave a Reply