वाढदिवसानिमित्त या अभिनेत्याने फोटो केला शेअर फोटो शेअर करताच झाला भाऊक

0
329
arjun kapur actor shared a photo on the occasion of his birthday

बॉलीवूडचा मोस्ट हँडसम अभिनेता अर्जुन कपूरचे त्याच्या कुटूंबासोबत अतिशय जवळचे नाते आहे. मात्र आता अर्जुन कपूर आपल्या आईच्या आठवणीत रमला आहे.

arjun kapoor mother

सोशल मीडियावर अर्जुनने दिवंगत आई मोना कपूर यांची आठवण काढत अर्जुनने इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.
अर्जुन कपूर आपली आई मोना कपूर यांच्याशी भावनिकदृष्ट्या खूपच अॅटॅच होता. आपल्या आईच्या आठवणी तो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतो. मोना कपूर यांना जाऊन नऊ वर्ष पूर्ण झाली.

आईच्या वाढदिवसानिमीत्त त्याने त्यांचा फोटो पोस्ट करत भावुक मेसेज लिहीला आहे.वाढदिवसाच्या शुभेच्छा आई… जेव्हा तू मला कॉल करायची तेव्हा तुझं नाव फोनच्या स्क्रीनवर दिसायचे, मला तुझी आणि अंशुलामधील कधीही न संपणारी चर्चा आठवते. मला तुझी आठवण येते. आई तुझे नाव बोलणे मिस करतोय… तुझा सुगंध आठवतो. मी मोठा झालो आहे. तु माझ्या प्रत्येक अडचणींमध्ये साथ देत असलेल्या समस्यांचे निरसण करत होतीस.

arjun kapoor bollywood actor

 

मला माझे बालपण आठवते. तुझ्यासोबत हसतानाचे दिवसही मला आठवत आहेत. तू नेहमी माझ्या पाठीशी होतीस, म्हणून मला सर्व काही आठवते. मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे, तू आमच्यासोबत आहेस आणि मला आशा आहे की माझ्या या स्वभावाचा तुला अभिमान वाटेल. तुझ्यावर प्रेम आहे… तुझा प्रामाणिक गुबगुबीत गालांचा मुलगा…’अशा आशयाची पोस्ट अर्जूनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर केली आहे. अर्जुन कपूरच्या या भावूक पोस्टवर त्याच्या चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Reply