देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या पातेलंभर तुपासोबत खायचे! या वाक्यावर पुन्हा ट्रोल

0
429
Devendraji used to eat 30-35 puranpolya leaves with Tupa! Troll on this sentence again

झी मराठीवरील किचन कल्लाकार या शोमध्ये भाजप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली उपस्थिती दर्शवली.

Amruta Fadnavis

नुकताच काही दिवसांपूर्वी आलेला झी मराठीवरील किचन कलाकार या शो ने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या शो मध्ये येणारा प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांच्या मनात स्थान एक वेगळं स्थान निर्माण करून जातो. नुसतेच अभिनयातले कलाकार नाही तर या कार्यक्रमात विविध क्षेत्रातल्या मंडळींनी आतापर्यंत हजेरी लावली आहे.

आता नुकत्याच्य भागात या शोमध्ये भाजप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली हजेरी लावली. आणि देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपली कार्यक्रमात हजेरी दर्शवली. यादरम्यान खूप गप्पा गोष्टी सुरू होत्या, त्यावेळी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या खाण्याच्या आवडीविषयी खुलासा केला. यावरून कशी मजेशीर गोष्टी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा नेतकऱ्यांनी अमृता फडणवीस यांना ट्रोलर्सच्या निशाण्यावर धरल आहे.

devandra Amruta Fadnavis

कार्यक्रमाचा हा भाग सुरू असताना कार्यक्रमाचा सूत्रसंचालन संकर्षण याने, एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? असा प्रश्न त्याने अमृता फडणवीस यांना विचारला. या प्रश्नावर ते 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तुपासोबत खायचे, असं उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं. या प्रश्नानंतर त्यांना लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर त्यांना 30-35 पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या, असं मजेशीर उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं. या उत्तरावरून अम अमृता फडणवीस यांना चांगलच ट्रोल केलं जातंय. त्यांचा हा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा त्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत.

यासोबतच अमृता फडणवीस या किचन कल्लाकारमध्ये कोंबडी वडे बनवणार आहेत. यावरून देखील ट्रोलर्संनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, कोणताही पदार्थ बनवा पण गाणं नको गाऊत. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, कोंबडी स्पेशल राणेंकडून घ्यावी..अशी कमेंट एकाने केली आहे. तर पुरणपोळीवरून एकाने म्हटलं आहे की, पुरण पोळी करा 30 -35 आणि देवेन्द्रजीना खाऊ घाला. अशा मजेशीर कमेंट करत अमृता फडणवीस यांना पुन्हा एकदा धारेवर ठेवले आहे.

Leave a Reply