लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत चित्रपटात काम केलेल्या या अभिनेत्रीला पाहिलत का….

0
467
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत चित्रपटात काम केलेल्या या अभिनेत्रीला पाहिलत का....

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत चित्रपटात काम केलेल्या या अभिनेत्रीला पाहिलत का….

1990 साली रिलीज झालेला चित्रपट कुलदीपमध्ये स्मृती तळपदे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केले होते. मराठी सिनेइंडस्ट्रीत नव्वदच्या दशकात काम केलेले बरेच कलाकार आता चित्रपटसृष्टीतून गायब आहेत.

ब-याच कलाकारांनी अभिनय क्षेत्राचा निरोप घेऊन इतर क्षेत्रात करिअर करण्याला प्राधान्य दिले आहे. अशीच अभिनेत्री म्हणजे स्मृती तळपदे. या चित्रपटानंतर त्यांनी इंडस्ट्रीला राम राम केला परंतु आपल्या कलेला वाव देण्यासाठी त्यांनी आयुष्यात डान्स अकॅडमी सुरू करून इतरांना नृत्याचे धडे देत आहेत. नृत्य क्षेत्रात कालांतराने त्यांनी यातच आपले करिअर करायचे ठरवले. गेल्या कित्येक वर्षांपासून अंधेरी, मुंबई येथे त्यांची नृत्य स्मृती या नावाने डान्स अकॅडमी आहे. या अकॅडमीमधून त्यांनी अनेकांना नृत्याचे धडे दिले आहेत.

Smriti talpade

कुलदीपक चित्रपटानंतर स्मृती तळपदे दुसऱ्या कोणत्या चित्रपटात पाहायला मिळाल्या नाहीत. मात्र लक्ष्मीकांत बेर्डे आणि स्मृती या दोघांवर चित्रित झालेले इस्पिक, चौकट, किलवर, बदाम. तुझीच राजा होईल गुलाम हे गाणे त्यावेळी खूप गाजले होते. त्यामुळे तृप्ती तळपदे प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहिल्या होत्या.

कुलदीपकमध्ये स्मृती तळपदे यांनी कमलची भूमिका साकारली होती. स्मृती तळपदे कुलदीपक चित्रपटानंतर अभिनय क्षेत्रात फारशा रमल्या नाहीत. अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांच्या आई आणि नृत्य शिक्षिका आशा जोगळेकर यांच्याकडून स्मृती तळपदे यांनी कथकचे धडे गिरवले . काही काळाने त्यांनी अभिनयाचा विचार सोडला आणि नृत्य क्षेत्रात आपला ठसा उमटवला.

Smriti talpade actress

Leave a Reply