कलाकारांच्या हाती क्रांती.! राजकीय पक्षात प्रवेश

0
356
Entering political party, Prajakta Mali Facebook post is hotly debated

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर बरीच गाजतेय, तिचा अभिनय असो वा तीची फॅशन तीची चर्चा कायम होत असते. शिवाय ती सोशल मिडीयावरही तितकी सक्रीय असते. सोशल मीडियावर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे.

नुकतीच, प्राजक्ता नं एक पोस्ट शेअर केली असून , ती पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. खरतर प्राजक्ता माळी ही एक अभिनेत्री असली तरीही राजकारणातील तिची दृष्टीकोन तितकाच खोल आहे. तीनं अनेकदा राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावलीय.प्राजक्ता माळीनं नुकतीच राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या निमित्तानं घेतलेल्या सभेला हजेरी लावली. यावेळचे काही व्हिडीओ फेसबुक शेअर करत प्राजक्ताने त्यासोबत एक पोस्टही लिहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Prajakta Mali

प्राजक्ता माळीने राज ठाकरे यांच्या सभेचे व्हिडीओ फेसबुकवर शेअर करत, नाही नाही… कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही. काल आयुष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली (खूप दिवसांपासून अनुभवायचीच होती..) ते फक्त तुमच्याबरोबर शेअर करतेय… इतकाच हेतू. कलाकार नंतर, आधी मी माणूस- सामाजिक प्राणी आहे; त्याच्या समृद्धी करता पण झटायला हवं. म्हणून हा घाट. (आता माझ्या आधार कार्ड वर मुंबईचा पत्ता आहे), असे कॅप्शनमध्ये लिहीले आहे.

प्राजक्ता माळीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिचे राजकारणासोबत कोणतेच राजकीय संबंध नाही असे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply