कंगनाचा गंगूबाई काठियावाडी चित्रपटावर आक्षेप

0
444
Kangana's objection to Gangubai Kathiawadi movie

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत, जी सोशल मीडियावर आपल्या स्पष्टवक्ते व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध आहे. संजय लीला भंन्साळी  दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा हा या आठवड्याच्या शेवटी प्रदर्शित होणार आहे. मात्र यापूर्वी कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीच्या माध्यामातून आलिया भट्ट, गंगूबाई आणि महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला आहे. तिने आलिया भट्टच्या आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीची खिल्ली उडविली, 200 कोटी या आठवड्यात जळून त्याची राख होणार आहे.

aliaa bhatt gangubai

कंगनाने खोचकपणे आलियाच्या येणाऱ्या सिनेमावर निशाणा साधला आहे. कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून आलिया भट्ट, गंगूबाई आणि महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला आहे की,  बॉक्स ऑफिसवर 200 कोटी जळून राख होणार आहेत. एक पप्पाची (फिल्म माफिया डॅडी) परी ( जे ब्रिटिश पासपोर्ट बाळगणं पसंत करतात) तिच्या वडिलांना सिद्ध करायचे आहे की, रोमकॉम बिंबो अभिनय करू शकते. या सिनेमाची सगळ्याता मोठी चूक काय असेल तर ते चुकीची कास्टिंग आहे…हे लोक कधीच सुधारणार नाहीत.  यात नवल असा  काही नाही कारण दक्षिण आणि हॉलीवूड चित्रपट मोठ्या पडद्यावर जाणे यात काही आश्चर्य नाही.” असे सांगत चित्रपट माफियांची सत्ता येईपर्यंत “नशिबातच” असल्याचे म्हटले.

Kangana Ranaut

अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. यावर सोशल मीडियावर अनेक रील्स तयार होत आहेत. यादरम्यान आलियाच्या एका छोट्या चाहतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती गंगूबाईच्या पात्राची नक्कल करताना दिसत आहे. यावप कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरील म्हटलं होत की, एका लहान मुलीने अशाप्रकारे एकाद्या सेक्स वर्करची नक्कल करणं तेही तोंडात बिडी आणि अश्लील संवादाने करणे योग्य आहे ? तिची जरा हावभाव पाहा. या वयात असा अभिनय करणं योग्य आहे का?  कंगना रनौतने  यावर निशाणा साधला आहे.

aliaa bhatt gangubai film photos

Leave a Reply