सलमान खान सोबत कतरिनाला रहावं लागणार! काय आहे नेमकं खरं कारण?

0
394
Katrina will have to stay with Salman Khan What is the real reason

गेल्या वर्षीच विकी-कतरिना ला शाही स्वरूपात विवाहसोहळा पार पडला. कित्येक चाहते त्यांच्या या उत्सुकतेचा भाग होते.

मागील वर्षीच कतरिना कैफ आणि विकी कौशल हे विवाहबंधनात अडकले. जवळपास वर्षभर सुरू असलेल्या अफेअर बाबत खरी काही ती माहिती येण्यासाठी नेटकऱ्यांचे डोळे चोविस तास उघडे होते. जेव्हा पासून दोघांनीही एकमेकांसोबत स्पॅाट करण्यात आले, तेव्हापासून बॅालिवूडच्या आणि सोशल मिडीयाच्या नजरा त्यांच्यावर होत्या. त्यांची जोडी आता बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक जोडी बनली आहे. त्यानंतर हे दोघंही चर्चेत आहेत. विकी कतरीनाचं लग्न हे सगळ्यांसाठी खूप मोठा धक्का होता. यातून सावरून आता सगळंच पूर्ववत होत असताना पुन्हा एकदा विकी – कतरीनामध्ये सलमान खान आल्याच्या बातम्या समोर येत आहे.

salman khan katrina

विकी-कतरीनाचा लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे असणार आहे. मात्र त्या दोघांनाही व्हॅलेंटाईन डे एकमेंकासोबत घालवतां येणार नाही असं दिसून येतोय. त्यांच्या यंदाच्या व्हॅलेंटाईन डे वर पाणी फिरणार असं दिसतंय.

vicky kaushal katarina

कारण चक्क सलमान खान व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कतरीनासोबत असणार आहे. मात्र खरं तर कतरिना या व्हॅलेंटाईन ला चक्क सलमान खान याच्यासोबत असणार आहे. याचे कारण असे की आजकाल कतरिना कैफ तिच्या नवीन चित्रपट ‘टायगर 3’ मुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये ती सलमान खानसोबत दिसणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या शूटिंगचे नवीन शेड्यूल लवकरच सुरू होणार आहे. सध्या ‘टायगर 3’ च्या शेवटच्या शेड्यूलचे शूटिंग बाकी आहे जे दिल्लीत शूट होणार असून जानेवारी मध्ये या चित्रपटाचे शेवटचे शूटिंग करण्यात येणार होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आता ‘टायगर 3’चे चे शूट फेब्रुवारीमध्ये करायचे आयोजिले आहे. म्हणून कतरिना यंदाच्या व्हॅलेंटाईन डे लिंक सलमान खान सोबत शूटिंगमध्ये व्यस्त असणार आहे.

Leave a Reply