आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधतीला जीवनाला मिळणार नवीन वळण…

0
448
Life will get a new twist for Arundhati in the series aai kuthe kay karate

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या अगदी मनामनात बसली आहे. मालिकेतील अरुधंती सर्व प्रेक्षकांना अगदी जवळची वाटते. या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. लवकरच मालिकेत अरुंधतीच्या जीवनात अनेक वळणं येणार आहेत. ज्या वेळे पासून अशितोष तिचा मित्र म्हणून तिच्या आयुष्यात आला आहे, त्या वेळेपासून तिच्या आयुष्यात बऱ्याच सकारात्मक गोष्टी घडत आहेत.

madhurani.prabhulkar

अशितोष तिच्या आयुष्यात येण्या पूर्वी अरुंधतीने आपली स्वप्न, आवडीनिवडी सर्व बाजूला सारुन कुटुंबच आपलं सर्व काही आहे. मात्र आता अरुंधतीच्या स्वप्नांना नवी आशा मिळणार आहे. गाण्याची प्रचंड आवड असणारी अरुंधती अखेर पाहिलं वहिलं गाणं रेकॉर्ड करणार आहे. आशुतोषच्यामदतीने ती तिच्या आयुष्यातलं पहिलं गाणं रेकॉर्ड करणार आहे.मालिकेतला गाण्याचा प्रसंग सुरेश वाडकर यांच्या आजिवासन स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आला. १२ वर्षांपूर्वी सुंदर माझं घर सिनेमाचं मी संगीत दिग्दर्शन केलं होतं तेव्हा रोज यायचे.आज या मालिकेच्या निमित्ताने हा योगायोग पुन्हा आला.

मालिकेतल्या या नव्या वळणाविषयी सांगताना मधुराणी गोखले म्हणाल्या, ‘खूप छान वाटतं, मला जेव्हा १० वर्षाच्या मोठ्या ब्रेक नंतर आई कुठे काय करते मालिकेत काम करण्याची संधी मला मिळाली.आई कुठे काय करते मालिकेत आता अरुंधतीचा नवा प्रवास सुरु होतोय तो कसा असेल हे पाहण्यासाठी मी स्वतः खूप मनापासून उत्सुक आहे.

Leave a Reply