रिंकू च या अभिनेत्या सोबत अफेर तर नाही ना? डिनर डेटच्या फोटो मुळे चर्चांना उधाण !

0
476
Rinku Rajguru has an affair with this actor, doesnt he Photos of the dinner date sparked discussions

रिंकूनं राजगुरूनं नुकताच आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केला असून सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. रिंकू राजगुरू आज मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. बऱ्याचदा अभिनेत्री रिंकू राजगुरू कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. रिंकू कधी साडी मधले आपले फोटो शेअर करून नेटकऱ्यांना पार घायाळ करते, तर कधी तिच्या फिट अँड फाईन जिम लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्रेक्षकांना तिच्या प्रेमात पाडते. रिंकूच्या या सर्व फोटोंना तिच्या चाहत्यांची नेहमी पसंती देखील मिळते. रिंकूनं नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमुळे आता रिंकू या अभिनेत्याला डेट करत आहे का , अशा चर्चा सध्या रंगत आहे.

rinku rajguru akash

 

रिंकू नं नुकतंच आपल्या इंस्टाग्राम स्टोरी वर अभिनेता आकाश ठोसरसोबतचा डिनर डेट चा फोटो शेअर केला आहे. या डिनर डेटचे फोटो रिंकूनं शेअर करत हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशा चर्चा सोशल मीडियावर होत आहे. आकाशसोबत चा फोटो शेअर करून रिंकूनं कॅप्शन दिलं, ‘खूप खाल्ल यार. उद्या जरा जास्त कार्डिओ करायला लागणार.’ त्याच बरोबर या फोटोवर ‘डिनर डेट’ असं स्टिकर देखील रिंकूनं टाकलं आहे.

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर बऱ्याचदा आपल्या सोशल मीडिया अकाउंट दोघांचे फोटो शेअर करत असतात. त्यावरून बरेच वेळा या दोघांचं काही तरी अफेर सुरु असे नेटकऱ्यांना वाटत असाव. सध्या दोघंही आपपाल्या उपकमिंग प्रोजेक्ट मध्ये व्यस्त आहेत .

Leave a Reply