पुन्हा एकदा रिंकू राजगुरू झळकणार या आगामी चित्रपटात!

0
345
Rinku Rajguru will be seen in this upcoming movie once again

सध्या मराठी सिनेसृष्टीत एकामागोमाग एक दणकट चित्रपट येऊन आदळत आहेत. त्यात आता आपली सर्वांची लाडकी रिंकू आता आपल्यासाठी नव्या कथा घेऊन येणार आहे. समीर कर्णिक निर्मित ‘आठवा रंग प्रेमाचा’ हा आगामी चित्रपट येत्या १७ जूनला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एका रूढ प्रेमकथेवर अवलंबून आहे , ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद ही नवी कोरी जोडी चित्रपटाच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अटॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाची निर्मिती केली असून आदिनाथ पिक्चर्सच्या आशिष भालेराव, राकेश राऊत प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

rinku rajguru new movie

रिंकू राजगुरूसोबत विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. याआधी समीर कर्णिक यांनी “क्यू हो गया ना..” या आपल्या पहिल्याच चित्रपटापासूनबॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर “यमला पगला दिवाना”, “चार दिन की चांदनी”, “हिरोज”, “नन्हे जैसलमेर” अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन समीर कर्णिक यांनी केलं आहे.

 

Leave a Reply