सागर कारंडे ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून बाहेर…काय आहे कारण?

0
456
Sagar Karande out of the show 'Chala Hawa Yeu Dya' ... what is the reason

‘झी मराठी’वरील लोकप्रिय शो ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचे खूळ सध्या सर्वांना आहे. आणि या थुकरटवाडीतील एक एक पात्र सरफवांच्या अगदीच जवळच वाटू लागला आहे. रसिकांना ते पोटधरुन हसवण्यापासून ते हसून हसून रडण्या पलीकडचे काम हि मालिका करते. याचबरोबर कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.

 

मात्र या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा तसंच त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता सागर कारंडेची सध्या कार्यक्रमात हजेरी दिसत नसल्याचं समोर येत आहे. काही दिवसांपासून सागर कारंडे (Sagar Karande) याने ‘चला हवा येऊ द्या’ शो सोडल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. सागर कारंडे ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम सोडतोय हे कळल्यावर त्याचा चाहता वर्ग नाराज झाला आहे. मात्र या चर्चाना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सागर कारंडे याने यावर सविस्तर भाष्य केले आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Sagar Karande

माध्यमांशी बोलताना त्याने सांगितले की, या वृत्तात काही तथ्य नाही. कारण नाटकांचे प्रयोग हे फक्त शनिवारी आणि रविवारी असतात. चला हवा येऊ द्याचे शूटिंग सोमवारी, मंगळवारी असते. सोमवार आणि मंगळवारी कोणत्याच नाटकाचे प्रयोग होत नाहीत. त्यामुळे मी नाटकातही काम करतो आहे आणि चला हवा येऊ द्या शोमध्ये देखील काम करतो. त्यामुळे अशी कोणती अफवा नाही आहे, आणि ती पसरवू देखील नयेत.

दरम्यान, सोशल मिडियावर काही दिवसांपासून सागर कारंडेने शो सोडल्याची चर्चा रंगली होती. मात्र अखेर त्याने यावर स्पष्टीकरण देऊन याबाबत खुलासा केला आहे.

Leave a Reply