हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडबद्दल सुजैन खानने अशी केली जोरदार कमेंट बाजी…

0
375
Suzanne Khan made a strong comment about Hrithik Roshan's girlfriend ...

मिस्ट्री गर्लचा खुलासा झाल्यानंतर आता दोघे पुन्हा एकत्र दिसले आणि डेटींगच्या आणि अफेअर्स च्या चर्चांना उधाण आलं आहे.

Hrithik Roshan girlfrieng

सध्या अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची मिस्ट्री गर्ल यांच्या चर्चा जोरात सुरू आहे. सध्या त्याच्या लव्ह लाईफ च्या चर्चांना उधाण आलं आहे. अभिनेता काही दिवसांपूर्वी एका मुलीचा हात धरुन रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसला. त्यानंतर ही मिस्ट्री गर्ल कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला. त्यानंतर मात्र त्या मुलीचं नाव समोर आल आहे. तिचं नाव सबा आझाद असल्याचं कळताच तिच्या फॉलोवर्समध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मिस्ट्री गर्लचा खुलासा झाल्यानंतर दोघे पुन्हा एकत्र दिसले आणि डेटींगच्या बातम्यांना जोर आला आहे.

Sussanne_Khan

दरम्यान, आता हृतिकची माजी पत्नी सुजैन खानने सबाच्या परफॉर्मन्सचं कौतुक केले आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर सुजैनने सबा आझादच्या गायनाचे कौतुक केले असून , तिने लिहिले ‘किती छान संध्याकाळ होती. सबा आझाद तुम्ही सुपर कूल आणि सुपर टॅलेंटेड आहात. सुजैनचे हे म्हणणे हे सबाचे मोठे कौतुक आहे. सबाने तिची पोस्ट पुन्हा शेअर करताना सुजैनचे आभार मानले आहेत. तिने लिहिले, ‘धन्यवाद माझी सुझी, काल रात्री तू तिथे होतीस याचा मला आनंद आहे.’ अशी पोस्ट शेअर करत लिहिले आहे. मात्र सुजैनची ही पोस्ट सबासोबतच्या तिच्या चांगल्या नात्याचा इशाराही देत आहे.

bollywood news

आणि सबा आणि हृतिक खरोखरच एकमेकांना डेट करत आहेत की नाही, याबाबत अजूनही कोणतीच खरी बातमी समोर आलेली नाहीय.

Leave a Reply