भारतीय संघात अशा अनेक जोड्या आहेत, ज्या नेहमीच चर्चेत असतात. त्यापैकी एक विरुष्का म्हणजेच विराट आणि अनुष्का. ह्यांची जोडी सर्वांनाच खूप आवडते आणि चर्चेत असते. हे कपल त्यांच्या लग्झरी लाइफसाठी अनेकदा चर्चेत असते. त्यांची मुलगी देखील बरीच चर्चेत असते.

पण, तुम्हाला माहित आहे का?
– या दोघांच्या लग्नाआधी एका मुलीने विराटला सर्वांसमोर प्रपोज केले होते आणि त्यावेळी विराटने काय उत्तर दिले होते, आज आम्ही तुम्हाला त्या मुली बद्दल सांगणार आहोत जिच्या मुळे विराट चांगलाच चर्चेत आला होता. मित्रांनो, एकेकाळी असं म्हटलं जात होतं की विराट कोहली आणि ही महिला खेळाडूं या दोघांची चर्चा खूप होत्या.
रिपोर्ट्सनुसार, ही महिला खेळाडू इंग्लंड महिला क्रिकेट डॅनियल व्याट आहे. त्यात असे म्हटले जाते की डॅनियल विराटला खूप पसंत करत होती शिवाय ती विराट कोहली ची खूप मोठी फॅन होती. एवढेच नाही तर २०१४ साली डॅनियलने विराटला लग्नासाठी प्रपोजही केले होते. मात्र, त्यावेळी विराटचे लग्नही झाले नव्हते आणि त्या दिवसात डॅनियल प्रपोज करतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता, जो खूप चर्चेत होता.
मात्र दरम्यानच्या काही दिवसात विराट आणि अनुष्का हे विवाहबंधनात अडकले, तेव्हा डॅनियलनेही त्यांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या, पण त्यावेळी डॅनियलने हे सर्व केवळ आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी केल्याचे बोलले जात होते.
आयपीएलच्या पहिल्या प्ले-ऑफ क्वालिफायर फेरीपूर्वी महिला टी-20 मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत अनेक महिला क्रिकेटपटू भाग घेणार आहेत. तसेच भारतीय संघाच्या दोन महान खेळाडू स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर या दोन्ही संघांचे नेतृत्व करणार आहेत.