सोशल मीडियावर व्हायरल होतोय वाहिणीसाहेबचा व्हिडीओ

0
432
dhanashri kadgaonkar

अभिनेत्री धनश्री काडगावकर ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रसिद्धिझोतात आली. धनश्रीने साकारलेली नंदिता गायकवाड ही भूमिका वहिनीसाहेब याच नावाने संबंध महाराष्ट्र भरात गाजली. धनश्रीने यापूर्वी ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकांमध्येही काम केले आहे.dhanashri kadgaonkar

धनश्री ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र या व्हिडीओमुळे तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे. धनश्रीचा हा रिल व्हिडीओ सध्या प्रचंड ट्रेंडीगवर असल्याचे पाहायला मिळत आहे. यात तिने छान जिन्स आणि काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. यात ती एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. यात एकाने ‘मस्त ट्रान्सफॉर्मेशन’ असे म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने ‘लयभारी’, ‘किती बारीक झालात’, अशीही कमेंट केली आहे. तर एकाने ‘काय वाहिनी, कसला डान्स आहे तुमचा सुपर से बहुत बहुत उपर,’ असेही म्हटले आहे.

गरोदरपणानंतर वाढलेलं वजन कमी करणं अनेक महिलांसाठी फार आव्हानात्मक असतं. मात्र धनश्रीने वर्कआऊट आणि डाएटच्या आधारे बरंच वजन कमी केलं आहे.धनश्रीचा नवा लूक चाहत्यांना भावला असून या फोटोवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.धनश्रीने काही महिन्यांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. धनश्रीने तिच्या बाळाचे नाव कबीर असे ठेवले आहे.

Leave a Reply