‘या’ कृत्यावर अल्लू अर्जुन वादात सापडेल का? पाहा नेमकं काय घडलं…

0
323
Will Allu Arjun be found in controversy over this act See exactly what happened

एकिक़डे अल्लू अर्जुनचा पुष्पा सिनेमाने लोकांच्या मनात घर केले आहे, तर दुसरीकडे पुष्पा पात्र साकारणाऱ्या अर्जून अर्जुन वर टीका केली जात आहे.

allu arjun pushpa

‘पुष्पा’  या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या आणि पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटांचा संपूर्ण जगात व्हा व्हा करणाऱ्या अल्लू अर्जुननं पुन्हा एकदा सर्वांना वेड लावलं आहे. एक खांदा वर करत, हनुवटीखालून हात फिरवत येणारा पुष्पाला विसरण जरा कठीणच जातंय. पुष्पा चित्रपट आणि या चित्रपटातील गाणी लोकांच्या ओठांवर येऊन बसली आहेत. आता सर्वाँना या चित्रपटा च्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे.

 

सर्व सुरळीत चालू असताना नुकतंच अल्लू अर्जुन आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर एक जाहिरात पोस्ट केली आहे,ही जाहिरात सध्या चर्चेचा विषय बनत आहे. आणि हा व्हिडिओ बराच व्हायरल होताना देखील दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये तो दमदार अॅक्शन सीन करताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर, इथं सुद्धा त्याची हटके स्टाईल डायलगबाजीसुद्धा पाहायला मिळत आहे.
एकिक़डे अल्लू अर्जुनचा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच दुसरीकड़े त्याच्यावर या व्हिडिओ मुळे टीका केली जात आहे.

आणि हे टिकाकरण त्याचेच चाहते करत आहेत. सर्व ठीक आहे मात्र या जाहिराती वरून अल्लू अर्जुनचे चाहते जरा जास्तच झाले आहेत. सर्व जण यावर आपआपले मत मांडत आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

तर जाहिरात अशी होती, इथे तो अॅक्शन सीन करतो, पण या अॅक्शन सीनमध्ये स्लोमोशन मध्ये खाली येणाऱ्या अभिनेता जेव्हा त्याला लवकर कर, असं म्हणतो तिथेच तो जरा चूक करतो.
हा साऊथ सिनेमा आहे….. असं तो मह्णताना दिसतो. आता अल्लू अर्जुन हे जाहिरातीच्याच निमित्ताने म्हणाला. पण, ही घोडचूक झाली अशीच वागणूक आता त्याला चाहते देत आहेत.

तुझ्या पिढ्या, तुढी पाळंमुळं इथूनच आहेत मग तूच दाक्षिणात्य सिनेमाची खिल्ली उडवू कसा शकतोस. असा सवाल त्याला काहीजण विचारत आहेत. सहसा प्रेक्षकांमध्ये आपली चांगली प्रतिमा असणारा अल्लू अर्जुन यावेळी काहीसा वाट भरकटला दिसून येत आहे.आता या टिकेवर त्याचं काय म्हणणं असेल यावर सर्वांचे लक्ष लगले आहे.

Leave a Reply